यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ – प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता सन्मानित

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ – प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता सन्मानित

मुंबई गुरुदत्त वाकदेकर) : समाजाभिमुख नवोपक्रम आणि ग्रासरूट इनोव्हेशनसाठी ओळखले जाणारे प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता यांना २०२५ साठी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. चव्हाण सेंटर दरवर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी देते. प्रो. गुप्ता हे हनी बी नेटवर्कचे संस्थापक आहेत.
पुरस्कार स्वीकारताना प्रो. गुप्ता म्हणाले, “परिस्थितीने गरीब असलेली माणसे ज्ञानाने गरीब नसतात. समाज समांतर असायला हवा, अन्यथा संधींचा अभाव प्रगतीला खुणावतो. लोकांसाठी केलेले संशोधन त्यांच्या भाषेत असल्यासच प्रभावी ठरते. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ४२ हजार गावांना जोडण्यासाठी प्रत्येक गावाची स्वतंत्र वेबसाईट असावी.” त्यांनी आपल्या सन्मानाची खरी किंमत गावोगाव फिरणाऱ्या सामान्य माणसांबरोबरच्या शोधयात्रेत असल्याचे सांगितले.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर असून समितीत डॉ. रूपा शाह, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. सुहास पेडणेकर, डॉ. नरेंद्र जाधव, श्री. विवेक सावंत, आय.एम. काद्री आणि डॉ. अंकुशराव कदम हे सदस्य आहेत. पुरस्काराची रक्कम रु. ५ लाख, सन्मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बाळसराफ यांनी केले. त्यांनी चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका आणि गेल्या चार दशकांतील समाजाभिमुख उपक्रमांचा आढावा उपस्थितांना दिला. दिलीप वळसे-पाटील, चव्हाण सेंटरचे विश्वस्त, म्हणाले, “डॉ. गुप्ता यांनी गावोगावी सर्व गाव वस्ती वेबसाईटने जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे विकासाभिमुख योजनांचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. चव्हाण साहेबांचे प्रागतिक विचार समाजात रुजतील.”
समारंभाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले. सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ, निवड समिती सदस्य, माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार प्रा. गुप्ता यांच्या नावावरून नवोपक्रम आणि समाजाभिमुख कामांची प्रेरणा भविष्यातही समाजात रुजू राहील.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मुंबईत घर पाडल्याच्या धक्क्याने ज्येष्ठाचा मृत्यू

मुंबईत घर पाडल्याच्या धक्क्याने ज्येष्ठाचा मृत्यू गोवंडीतील एसआरए प्रकल्पात कारवाई; समिती सदस्य आणि बिल्डरविरोधात गुन्हा दाखल मुंबई-तील परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन...
Read More
मुंबईत घर पाडल्याच्या धक्क्याने ज्येष्ठाचा मृत्यू

तळवली आगरवाडी येथे उद्या विविध कार्यक्रम श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 चे आयोजन

तळवली आगरवाडी येथे उद्या विविध कार्यक्रम श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 चे आयोजन गुहागर -प्रतिनिधी तालुक्यातील तळवली...
Read More
तळवली आगरवाडी येथे उद्या विविध कार्यक्रम श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 चे आयोजन

₹१२ लाखांच्या ग्रामपंचायत इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला मिळेना…  माहिती आयोगाच्या आदेशानंतरही दाखला प्रलंबित; तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी

₹१२ लाखांच्या ग्रामपंचायत इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला मिळेना…  माहिती आयोगाच्या आदेशानंतरही दाखला प्रलंबित; तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी   *रत्नागिरी :...
Read More
₹१२ लाखांच्या ग्रामपंचायत इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला मिळेना…   माहिती आयोगाच्या आदेशानंतरही दाखला प्रलंबित; तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी

जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत आनंदी बाजार व जागतिक महिला दिन उपक्रम उत्साहात संपन्न

जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत आनंदी बाजार व जागतिक महिला दिन उपक्रम उत्साहात संपन्न रत्नागिरी - जि.प. आदर्श...
Read More
जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ शाळेत आनंदी बाजार व जागतिक महिला दिन उपक्रम उत्साहात संपन्न

तळवलीत आज रंगणार दोन बहीणीचा पालखी भेट सोहळा भक्तांनमध्ये नवचैतन्याचे वातावरण

तळवलीत आज रंगणार दोन बहीणीचा पालखी भेट सोहळा भक्तांनमध्ये नवचैतन्याचे वातावरण तळवली(मंगेश जाधव)-गुहागर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेले तळवली गावची ग्रामदैवत...
Read More
तळवलीत आज रंगणार दोन बहीणीचा पालखी भेट सोहळा भक्तांनमध्ये नवचैतन्याचे वातावरण

गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; आता ‘इतक्या’ दिवसांनंतरच करता येणार दुसरे बुकिंग!

गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; आता 'इतक्या' दिवसांनंतरच करता येणार दुसरे बुकिंग! आंतरराष्ट्रीय तणावाचा घरगुती गॅस पुरवठ्यावर परिणाम; 'पॅनिक...
Read More
गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; आता ‘इतक्या’ दिवसांनंतरच करता येणार दुसरे बुकिंग!

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ – प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता सन्मानित

यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ – प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता सन्मानित मुंबई गुरुदत्त वाकदेकर) : समाजाभिमुख नवोपक्रम आणि ग्रासरूट...
Read More
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२५ – प्रो. डॉ. अनिल कुमार गुप्ता सन्मानित

ब्रेकिंग: जगातील सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! IEA देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन

ब्रेकिंग: जगातील सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! IEA देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन पश्‍चिम आशियातील युद्धाचे...
Read More
ब्रेकिंग: जगातील सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! IEA देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे संपूर्ण प्लॅन

बिअर बारमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून तुफान राडा; बांबू आणि दगडाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

गुहागर: बिअर बारमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून तुफान राडा; बांबू आणि दगडाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल पालशेतमधील हॉटेल 'गारवा'बाहेर राडा; किरकोळ...
Read More
बिअर बारमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून तुफान राडा; बांबू आणि दगडाने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना

गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना तळवली (मंगेश जाधव)-गुहागर येथील आगारातील मुख्य कार्यालयात आज...
Read More
गुहागर येथील आगारात प्रवाशी राजा लोकशाही दिन उत्साहात साजरा अनेक समस्यावर उपाययोजना