देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

लांजा- (जितेंद्र चव्हाण).राजापूर तालुक्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आणि खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेले लोकप्रिय आमदार मा.श्री.किरण सामंत साहेब व उद्योग मंत्री मा.श्री.उदय सामंत साहेब यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे लांजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ लांजा तालुक्यात उपलब्ध करून देण्यात आली असून, या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोलाची भर पडली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता असूनही त्यांना योग्य सुविधा व क्रीडा साहित्य मिळत नाही, ही उणीव ओळखून आमदार साहेबांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचाच हा सकारात्मक परिणाम असून, अशा प्रकारची अत्याधुनिक मॅट देशात प्रथमच लांज्यात उपलब्ध झाली आहे.
या ‘लेव्हल-३’ मॅटमुळे आता लांजातील खेळाडूंना जागतिक दर्जाचा सराव करण्याची संधी मिळणार आहे. या मॅटचे उद्घाटन दिनांक ६ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह, लांजा येथे आमदार मा.किरण सामंत साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे आणि अकॅडमीचे अध्यक्ष श्री. किशोर यादव यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास श्री. सुनील कुरूप, श्री. गुरुप्रसाद देसाई, श्री. महेश खामकर तसेच लांजा तालुक्यातील तायक्वॉंदो खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार मानले आहेत यामध्ये अध्यक्ष श्री.व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे मार्गदर्शक श्री.परशुराम मासये,उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे यांचा समावेश होता.
तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, शीतल विरेंद्र आचरेकर,अकॅडमी चे प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, गौरव दीपक खेडकर, गणेश ईश्वर तोंडारे, तेजस वडवलकर, योगेश ईश्वर तोंडारे यांसह सर्व खेळाडू व पालक वर्गाने आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
“आपल्या तालुक्यातील मुला-मुलींना ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर खेळताना पाहणे हे माझे स्वप्न आहे. ही मॅट केवळ सुविधा नसून खेळाडूंच्या यशाची पहिली पायरी आहे,”
—आमदार किरण सामंत
या सुविधेमुळे भविष्यात लांजा तालुक्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तायक्वॉंदो खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या उल्लेखनीय कार्यामुळे क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आमदार साहेबांच्या विकासकामांचा झंझावात पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

■ ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई ■ २७ मार्च ला दाखल केला होता चौकशी अहवाल ■...
Read More
ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

“देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय” लांजा- (जितेंद्र चव्हाण).राजापूर तालुक्याच्या विकासासाठी...
Read More
देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More
पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच,...
Read More
नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६-  कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय 'ब्लॅक बेल्ट' परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या यशाने लांजाचा नावलौकिक; ७...
Read More
लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

■ राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश ■ अध्याप चौकशी न...
Read More
राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे...
Read More
टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): राजीव गांधी आंतरराष्ट्रीय...
Read More
पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

*पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ *२६वे कविसंमेलन दादरमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा