■ ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई
■ २७ मार्च ला दाखल केला होता चौकशी अहवाल
■ ,तहसीलदार यांची मालकाला नोटीस,तर ब्लास्टिंग प्रकरणी पोलीस निरीक्षण राजापूर यांना कार्यवाहीसाठी पत्र
■ *समिर शिरवडकर -रत्नागिरी.
राजापूर :- ( ताम्हणे) :- राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणीं अनधिकृत गौण खनिज उत्खनन होत असुन, त्याची वारंवार सूचना मा. तहसीलदार विकास गमरे याना दिली होती.या अगोदर राजापूर मधील कोदवली,साखर कोंबे, डोंगर आणि आत्ता ताम्हणें पहिली वाडी मधील अनधिकृत उत्खनन आणि जिलेटिन ब्लास्टिंग दि.२५ मार्च रोजी आमचे प्रतिनिधी ने घटनास्थळी जाऊन परिस्थिती ची पाहणी करून बातमी केली होती. त्यानंतर सौंदळचे मंडळ अधिकारी यांनी तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे दि.२७ मार्च ला सादर केला होता.त्यावेळी त्यांनी प्रतिनिधी शी बोलताना “आम्हाला अनधिकृत कामे थांबविण्याचा अधिकार आम्हला नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. याचा पाठपुरावा करत मा. तहसीलदार यांनी संमधीत मालक दत्तात्रय संपत्ती धामणेकर यांना कारवाई ची दि.१ एप्रिल २६ ला जा. क्र.१४२/२०२६ नुसार नोटिस बजावली आहे.तसेच ताम्हणे पहिली वाडी हे गाव शासनाच्या इको -सेन्सेटिव्ह घोषित केले असल्याने याच गावात समंदीत मालकाने विहीर खोदण्यासाठी जिलेटीन ब्लास्टिंग केल्याने मा.पोलीस निरीक्षक राजापूर याना परवानगी नसताना ब्लास्टिंग केल्या प्रकरणी दि.१ एप्रिल २६ रोजी प्रकरणी कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले आहे.
तात्पुवी,मागील सहा ते आठ महिन्यांपूर्वी इको-झोन मधील महसूल गाव डोंगर या गावात मातीचे डोंगर च्या डोंगर उध्वस्त करुन तिकडे सपाटीकरण केले जात आहे त्यावर अजूनही मा. तहसीलदार विकास गमरे यांचे लक्ष नाही का? असा प्रश्न निर्माण होतो.त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन निर्णय ०४/०६/१४ महाराष्ट्र पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र घोषित समिती नेमली होती ती समिती कोणते काम करते की नुसतीच कागदावर आहे का?असाही प्रश्न निर्माण होतो.या समिती मध्ये सरपंच, वनरक्षक, ग्रामविकास अधिकारी,महसूल अधिकारी, आणि कृषि अधिकारी हे नावापुरते आहेत का?असाही प्रश्न निर्माण होतो.
सदर, वरील सर्वच अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग वरती तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आणि जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतील याकडे समस्त राजापूर वासियांचे लक्ष लागले आहे.















