
वेलदूर नवानगर येथे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुहागर (वार्ताहर)- गुहागर तालुक्यातील वेलदूर, नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व ग्रामपंचायत वेलदूर तसेच शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा वेलदूर नवनगर मराठी यांच्या विद्यमाने वेलदूर नवानगर येथे स्वच्छता ही सेवा कार्यक्रम अत्यंत दिमाखदार व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.त्यावेळी वेलदूर नवानगर रोहीलकर वाडीचे प्रमुख नारायण रोहीलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, श्रीराम महिला मंडळाच्या अध्यक्षा विशाखा रोहिलकर ,पोलीस पाटील अमोल वायंगणकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील, अंजली मुद्दमवार, अफसाना मुल्ला ,धन्वंतरी मोरे, सामाजिक कार्यकर्ते मनोज पावस्कर ,उमेश रोहिलकर ,विकास रोहिलकर ,शैलजा रोहीलकर, माधवी रोहीलकर ,प्रिया रोहीलकर ,विद्या रोहीलकर, योगिनी तीमसेकर ,सुहासिनी रोहीलकर, प्रणाली रोहीलकर ,मनश्री पालशेतकर ,मंथना रोहीलकर ,कविता रोहिलकर ,त्रिशा कोळथरकर ,संघप्रिया रोहीलकर, प्राजक्ता रोहिलकर, सुहानी नाटेकर ,निशा जाधव ,सोनिया नाटेकर ,वैष्णवी कदम, रीना रोहिलकर ,मत्स्यगंधा कोळथरकर ,स्मिता रोहीलकर ,सोनाली वनकर, विशाखा नाटेकर, सुरक्षा रोहीलकर ,विश्लेषा रोहिलकर ,सविधा रोहिलकर ,सुगंधा रोहिलकर ,जयमाला रोहीलकर, देवयानी पावसकर व युवक मंडळ व महिला मंडळ ग्रामस्थ यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला .त्यावेळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर येथील परिसर, नवानगर बस स्टॉप येथील परिसर, श्रीराम मंदिर परिसर, रस्ते, सागर किनारे यांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांनी परिसर स्वच्छ करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण करून दिला आहे वेलदूर नवानगर येथे शासनाचे विविध उपक्रम सेवाभावी वृत्तीने राबविलेले जातात स्वच्छता अभियान कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहीलकरवाडी, विठ्ठलवाडी, वनकर वाडी व मोहल्ला येथील ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

