मला मदत करा’, मृतदेहाची स्वप्नात आर्त हाक, पोलिसांना सांगितल्यानंतर धक्कादायक बाब उघड, घटनेने सर्वत्र खळबळ..
Ratnagiri Crime News: स्वप्नातील वर्णन त्याने खेड पोलिसांना सांगितलं त्यावरुन केलेल्या शोधानंतर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडली आहे.
: रत्नागिरी -(वार्ताहर )-जिल्ह्यात खेड तालुक्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावरून खेड भोस्ते घाटातील एका मृतदेहाचा शोध लागला आहे. त्यामुळे काल बुधवारी संध्याकाळी मिळालेल्या या अनोळखी मृतदेह प्रकरणी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील एका व्यक्तीला आपल्याला स्वप्न पडत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.
स्वप्नातील वर्णन त्याने खेड पोलिसांना सांगितलं त्यावरुन केलेल्या शोधानंतर खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा सापळा आणि कवटी तसेच झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी बुधवारी संध्याकाळी सापडली आहे. मात्र, या आश्चर्यकारक प्रकरणानंतर हा अनोळखी मृतदेह कोणाचा आहे? तसेच हा सापळा आणि कवटीचे गूढ वाढले असून थेट एका व्यक्तीच्या स्वप्नात येऊन ”मला मदत करा”, असं सांगणारी अचंबित करणारी गोष्ट घडली आहे..