सैफ ची प्रकृती स्थिर; मुंबईत सर्वात सुरक्षित शहर! एका प्रकरणावरून बदनामी नको -देवेंद्र फडणवीस
मुम्बई पोलीस योग्य दिशेने तपास करीत आहेत.

मुंबई – अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर त्यांच्यावरील वैद्यकीय उपचार मुंबई येथे करण्यात आले. यावेळी वैद्यकीय पथकाने त्यांची प्रकृती आता स्थिर असून चाकूचा तुकडा सफ अली खान यांच्या जखमेतून आता काढण्यात आला असल्याची माहिती दिली.
त्याचवेळी सैफ अली खान यांच्यावर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर शोधण्यासाठी पोलिसांनी दहा पथकांच गठण केलं आहे. याचवेळी पोलिसांनी संशयिताचा पहिला फोटो जारी केला आहे.
याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या अनुषंगाने होणाऱ्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहर असून केवळ एका घटनेमुळे या शहराची बदनामी करू नये असे वक्तव्य केले आहे.