देवरूख येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
कु. रिया गिज्ये हिने पटकावला प्रथम क्रमांक*
देवरूख— (वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाने स्व. शांता अनंत साने स्मरणार्थ आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कु. *रिया रवींद्र गिज्ये* (माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाने )हिने *प्रथम क्रमांक पटकाविला. कुमारी *सार्थकी प्रकाश सकपाळ*( ए. ए. पाध्ये इंग्रजी माध्यम शाळा, देवरुख) हिने *द्वितीय क्रमांक* आणि कुमार *प्रज्वल पद्माकर गंगावणे* (माध्यमिक आश्रम शाळा, निवे) याने *तृतीय क्रमांक* पटकाविला. कु. *प्राची राजेश गुरव*( जनता विद्यालय, आंगवली आणि *कुमारी सिमरन विलास म्हादे*(न्यू इंग्लिश हायस्कूल,कसबा) यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांकाला पारितोषिक रुपये *1000*, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देण्यात आली. द्वितीय क्रमांकाला पारितोषिक रुपये *750*, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देण्यात आली. तृतीय क्रमांकाला पारितोषिक रुपये *500*, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देण्यात आली. उत्तेजनार्थ निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देण्यात आली. स्पर्धेसाठी क्रांतीज्योती *सावित्रीबाई फुले*: व्यक्ती आणि कार्य, माजी पंतप्रधान स्व. *अटल बिहारी वाजपेयी*: व्यक्ती आणि कार्य आणि *स्वामी विवेकानंद* : व्यक्ती आणि कार्य असे विषय होते. स्पर्धेचे परीक्षण निवृत्त माध्यमिक शिक्षिका मा.सौ मंगला शामकांत अळवणी यांनी केले. सर्व स्पर्धक उत्तम तयारी करून आले होते असा अभिप्राय त्यांनी नोंदवला. त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा संगमेश्वर तालुक्यात माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या *आठवी ते दहावी* तील विद्यार्थ्यांकरिता मर्यादित होती. सर्व विजेत्यांचे वाचनालयाचे अध्यक्ष, श्री गजानन केशव जोशी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत सहभागी सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे त्यांनी आभार मानले. स्पर्धेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते माननीय श्री उमेशजी आपटे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ श्रद्धा अशोक आमडेकर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी वृंदाचे उत्तम सहकार्य लाभले. ग्रंथापाल सौ श्रद्धा अशोक आमडेकर यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.