मुंढर गावपॅनलच्या वतीने अमिषा गमरे यांची सरपंचपदी निवड
तळवली (मंगेश जाधव)
गुहागर – तालुक्यातील निर्मल ग्रुपग्रामपंचायत मुंढर-कातकीरी या ग्रामपंचायत च्या गावपॅनलच्या वतीने महिला उमेदवार अमिषा अजित गमरे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
निर्मल ग्रुपग्रामपंचायत मुंढर-कातकिरी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अमिषा गमरे यांची निवड झाल्याबद्दल बौद्धजन सहकारी संघ, शाखा क्र. २४, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी (गाव मुंबई शाखा) यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी शासकीय नियमानुसार कामाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नायब तहसिलदार सावर्डेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना सहकार्य करण्यासाठी ग्रामसेवक एस. बी. गोरे, माजी सरपंच प्रदीप अवरे, उपसरपंच धनावडे, सदस्य मंडळ, प्रभाकर शिर्के, बाजार समिती अध्यक्ष सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच पदी विराजमान होताच त्यांची ग्रामपंचायत ते बुद्धविहार अशी भव्यदिव्य फटाक्यांची आतिषबाजी करीत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.