ऐतिहासिक श्री भरत दुर्गा देवी मंदिर कलशारोहन सोहळा…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ऐतिहासिक श्री भरत दुर्गा देवी मंदिर कलशारोहन सोहळा…

 

कार्यक्रम रविवार २ व ३ फेब्रुवारी २०२५ होळी पावनभूणीत.

 

सर्व भक्तांनी कलशारोहन कार्यक्रमाल उपस्थित राहण्याचे विघ्नेश गोखलेचे आवाहन

 

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

 

राजापूर :- ( होळी) :- प्राचिन काळापासूनचा इतिहास असणारी, आणि भक्तांच्या नवसाला पावणारी आई श्री भरत दुर्गा देवी अशी प्रचिती अनेक भक्तांना अलेली आहे.अश्या पुरातन मंदिराच्या कळसाला नवीन चांदीचा कळस बसविण्याची महत्वकांक्षी योजना गावातील ग्रामस्थांनी हाती घेतली आहे.त्यानुसार रविवार दिनांक २ व ३ फेब्रुवारी २०२५ रोजी भरगच्च असे कार्यक्रम समस्त होळी वासियांनी नियोजीत केले आहेत.

रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वा. कलश भव्य शोभायात्रा -मार्ग होळी स्टॉप ते देवीचा मांड व दुर्गेच्या मंदिरापर्यंत ढोल-तश्या पथक, व महिलांच्या डोक्यावर घागर घेऊन भव्य मिरवणूक. सांयकाळी.७.०० वा. वारकरी दिंडीभजन ( दाभोळ तेलीवादी).सोमवार दि.०३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.०० गो पूजन,आचार्य पुजन, इतर मंत्रपुष्पांजली..दुपारी.२.०० वा. महाप्रसाद, सायं.४.०० वा. मान्यवरांचा सत्कार, सायं.५.०० वा. महिलांसाठी हळदी कुंकु, सांय.७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम असून सर्व भक्तगणांनी उपस्थिती राहून,या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विघ्नेश गोखले यांनी केले आहे.

 

श्री भरत दुर्गेचा पेशवेकालीन इतिहास.

 

◆ राजापूर तालुक्यातील होळी गावातील श्री देवी भरत दुर्गा हिचे मंदीर प्राचीन काळातील आहे,सदर,मंदिर श्री गोखले ( खोत) आणि ग्रामस्थ यांनी मिळुन बांधले. सवाई माधवराव पेशवे या होळी गावतील कै. ती. विठ्ठल गणेश गोखले उर्फ अण्णा गोखले यांची कन्या ज्यावेळी सवाई माधवराव पेशव्यांचा विवाह योजिला गेला,त्यावेळी महाराष्ट्रातुन अनेक उपवर मुली सोहळ्यास हजर राहण्याकरिता पूणे येथे गेल्या, तेव्हा होळी गावातील अण्णा गोखले यांची कन्या सुद्धा पूणे येथे जात असताना देवी श्री भरत दुर्गेला तीने असा नवस केला की,पेशवे यांच्याकडून माला वधू म्हणून वरले गेल्यास मी माझ्या योग्यतेने तुझी सेवा करिन,त्याप्रमाणे देवी नावसला पावली व पेशवे यांनी सून म्हणुन अण्णा गोखले यांच्या कन्येची निवड केली तद्नंतर स्वतः पेशवे होळी मुक्कामी येऊन देवीला एकावन्न तोळ्यांचा सोन्याचा मुखवटा आणि साधारणपणे एकावन्न पुतळ्याची माळ अर्पण केली.अशी हो मनापासून केलेल्या नावसला पावणारी श्री भरत दुर्गा देवी आहे.

▶️ YouTube व्हिडिओ साठी येथे क्लिक करा????

■ पिढ्यानपिढ्या चा वारसा असाच लाभू दे आम्हा ह्याच तुझ्या उंबरठ्यापाशी

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

Leave a Comment

आणखी वाचा...