बळीराज सेना युवा नेते ॲड. विनेश अशोक वालम कोकण दौऱ्यावर

आबलोली (संदेश कदम)
बळीराज सेना युवा नेते ॲड. विनेश अशोक वालम हे दिनांक 8,9 व 10 फेब्रुवारी 2025 रोजी कोकण दौऱ्यावर येत असल्याची माहिती बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
बळीराज सेना पक्ष बांधणी व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यासाठी हा संपर्क दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान या वेळी पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी शरद बोबले,संतोष निवाते, विनेश वालम यांचे सोबत रहाणार आहेत. नियोजन नुसार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी चिपळूण तालुका भेटीगाठी.
9 फेब्रुवारी रोजी गुहागर तालुका तर 10 रोजी खेड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी व पक्ष वाढीसाठी महत्वाची चर्चा विनेश वालम व अन्य पदाधिकारी करणार आहेत. त्यांचे या दौऱ्यामुळे बळीराज सेनेच्या कार्यकर्ते मध्ये उत्साह निर्माण झाला आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.