कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मधील अभिजात मराठीला डावलून सुरू असलेल्या गुजराती अतिक्रमणाविरोधात मराठी एकीकरण समिती नवी मुंबई शिलेदारांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव यांची घेतली भेट
नवी मुंबई (मंगेश जाधव) –
मागील ३ वर्षांपासून याविरोधात समितीचा पाठपुरावा सुरू असून कोर्टाच्या आदेशानंतर काहीप्रमाणात दुकानांच्या पाट्या मराठीत लागल्या आहेत.
परंतु ग्राहकांना देण्यात येणारी देयके,वस्तूंवरील लहान फलक, गुजराती, इंग्रजीत, तसेच मोठ्या प्रमाणात दुकानांच्या पाट्या इंग्रजीत आहेत त्या सर्व पाट्या, ग्राहकांना देण्यात येणारी देयके तसेच वस्तूंवरील लहान फलक हे देखील मराठीत लावले जावेत याबाबत निवेदन देऊन विनंती करण्यात आली.
जर पुढील १५ दिवसात याबाबत कारवाई करून बदल झाले नाहीत आणि मराठी एकीकरण समिती संघटनेला याबाबत लेखी कळवले नाही तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि भाषिक अतिक्रमणाविरोधात कायदेशीर कारवाई तसेच बाजार समिती प्रवेश द्वारावर समिती मार्फत आंदोलन करण्यात येईल.
गेल्या ३ वर्षे यावर पाठपुरावा सुरू असून देखील प्रशासन व राज्यकर्ते याबाबतीत गंभीर नाहीत.
इतक्या वर्षे अनेक राजकीय मंडळी शहरात आहेत हा मुद्दा मार्गी लावू शकले नाही
मुंबई कृषिउत्पन बाजार समितीचे मराठीपण संपवले आणि शासन, मराठी भाषा विभाग, मंत्री गप्प आहेत.