अखेर राजापुर चे माजी आ.राजन साळवी यांचं ठरलं, उद्या शिंदे च्या शिवसेना मधे घेणार प्रवेश.
???? आ.राजन साळवी यांचा उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र
रत्नागिरी – अखेर माजी आमदार राजन साळवी यांचा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र उद्या दुपारी दोन वाजता शिंदे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात आनंद आश्रमात या ठिकाणी करणार पक्षप्रवेश.
गेले काही दिवस माजी आमदार राजन साळवी हे पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आणि साप्ताहिक रत्नागिरी वैभवने सांगितल्याप्रमाणे उद्या राजन साळवी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान उद्या दोन वाजता ठाणे येथील आनंद दिघे याच्या आनंद आश्रम या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार माजी आमदार राजन साळवी याच्या सोबत ८०० लोक पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ संजय साळवी व इतर कार्यकर्ते ही प्रवेश करणार असल्याचे नक्की झाले आहे.
दरम्यान राजन साळवी याच्या पक्ष प्रवेशाने आमदार किरण सामंत काय प्रतिक्रिया देतात हे पहावं लागणार आहे. तसेच आमदार किरण सामंत यांचा विरोध असताना ही त्याच्या नेत्यांनी राजन साळवी यांना शिवसेने मध्ये घेतलं आहे.
खरं तर माजी आमदार राजन साळवी हे पूर्वी च्या शिवसेने मध्ये एकनाथ शिंदे याचे लहान भाऊ मानले जायचे. राजन साळवी जर इतरांन प्रमाणे पक्ष सोडून तेव्हाच गेले असते तर आता मंत्री झाले असते.
अखेर राजापुर चे माजी आ.राजन साळवी यांचं ठरलं, उद्या शिंदे च्या शिवसेना मधे घेणार प्रवेश.
परंतु आता ही शिवसेने चे प्रमुख एकनाथ शिंदे त्याच्यावर अन्यया करणार नाहीत. त्यांना विधानपरिषद आमदारकी आणि महा मंडळाचे अध्यक्ष पद देण्यात येणार आहे.