वन्य प्राण्याकडून होणाऱ्या नुकसानी संदर्भात वनविभागाकडून सर्वेक्षण

लांजा ( जितेंद्र चव्हाण वार्ताहर) – तालुक्यामध्ये माकडांच्या टोळक्यासह रान डुक्कर व अन्य वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीच्या नुकसानी संदर्भात वन विभागाकडून गुरुवारी 13 फेब्रुवारी रोजी साटवली दशक्रोशीतील ३५ ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून आढावा व सर्वेक्षण करण्यात आले.
तालुक्यातील विविध गावांमध्ये माकडांच्या टोळक्याने उच्चाट मांडला असून शेतकऱ्यांच्या भाजीपाला फळबाग लागवडीचे मोठे नुकसान केले जात आहे. याशिवाय रानडुक्कर ,गवारेडे ,साळुंदर व अन्य वन्य प्राण्यांकडून आंबा ,काजू ,सुपारी व अन्य पिके, भाजीपाला नुकसान केले जात असल्याने शेतकरी पुरताच हैराण झाला आहे.
पार्श्वभूमीवर लांजा लांजा तालुक्यामध्ये होणाऱ्या वन्य प्राणी आणि संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सर्वे करण्यात आला. साटवली, रूण, सडवली, बापरे, गोळवशी, कोंडये, बेणी बुद्रुक, पनोरे, इसवली, जावडे शेतकऱ्यांच्या बागेमध्ये जाऊन कोण कोणत्या वन्य प्राण्यांपासून शेतीची, फळपिकांची व भाजीपाला यांची नासधूस केली जाते. यासंदर्भात खास नागपूर येथून आलेल्या श्रीम. अभिलाषा पुलझेले यांनी सर्वे केला. यामध्ये माकड या प्राण्यांकडून शेतीचे, फळपिकांचे, घरादाराचे साल करीत असल्याची बाब सर्वे दरम्यान पुढे आली.
आंबा बागायतदार, काजू बागायतदार, भाजीपाला शेती नुकसान ही माकड /वानर या प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असून शेतकऱ्यांना आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी नेपाळमधून खास नेपाळी माणसे बोलून त्याची राखण करावी करावी लागत आहे. त्याचा आर्थिक भूदंड हा शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या पटीमध्ये बसत असून शेतकरी हा अक्षरशः हवालदिल झालेला आहे. अशी व्यथा साटवलीचे शेतकरी जितेंद्र चव्हाण, अलीमुद्दीन काझी यांनी वन विभागाच्या नागपूर येथून आलेल्या अधिकारी श्रीम.अभिलाषा फुलझले यांच्यासमोर मांडली.
या सर्वेशनादरम्यान विभागीय वन अधिकारी चिपळूण श्रीम. गिरिजा देसाई, सहाय्यक वनरक्षक श्रीम. प्रियंका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री. प्रकाश सुतार, श्रीम. अभिलाषा फुलझेले (नागपूर), लांजा वनपाल श्री. सारीक फकीर, वनरक्षक श्री. बाबासाहेब ढेकळे, श्री. श्रावणी पवार (वनरक्षक कोलेंं) आदी उपस्थित होते.