छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुहागर तालुक्याचे सुपूत्र शशांक कोंडविलकर यांचे नविन गाणे “राजे शिव छत्रपती” युट्यूब वर तुफान गाजतयं
आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, कवी, गीतकार, अभिनेता तसेच आय झेड कोकणातले चे सूत्रधार,
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि गुहागर तालुक्यातील शृंगारतळी – जानवळे गावचे सुपूत्र शशांक कोंडविलकर
यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराजांना मानाचा मुजरा देण्यासाठी
“राजे शिव छत्रपती ” हे नवीन गाणं लेखणी रूपात जनतेला अर्पण केले आहे.
महाराजांचे हे गाणे नुकतेच रिलिज झाले असून या गाण्याने युटूब चॅनलवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
प्रसिद्ध संगीतकार गणेश सुर्वे यांच्या सुमधुर संगीताला आघाडीचे गायक रोहित राऊत यांनी स्वरसाज चढवला आहे
तर दिग्दर्शनाची धुरा चेतन गरुड आणि नृत्य दिग्दर्शन सिद्धेश पै यांनी सांभाळल आहे .
उमाकांत येले याचे छायाचित्रण असून निखिल साबळे यांची हि सदाबहार कलाकृती आहे
टि सिरीज भक्ती मराठी या युटूब चॅनलवर हे गाणं वाजतय आणि गाजतय सुद्धा
त्यामुळे या सर्व टिमला आणि कलाकारांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांकडून,
शिवप्रेमी भक्तांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.