१९ रोजी आबलोली येथे भोसले परिवारा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवा निमित्ताने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील आशिष राजाराम भोसले यांच्या निवासस्थानी भोसलेवाडी येथे बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०३:०० ते सायंकाळी ०५:०० यावेळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने आबलोली परिसरातील श्री. गणेश मूर्तिकार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तरी आबलोली पंचक्रोशीतील जनतेने रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी बहुसंख्येने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन भोसले परिवार आबलोली यांच्या तर्फे ऋणाली, नंदन, रुंजी, स्वानंदी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.