रत्नागिरीत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिरे
रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांच्या प्रेरणेतून, सामाजिक न्याय, अधिकारिता व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांत ADIP योजना आणि वयोश्री योजना अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. ADIP योजनेत दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव आणि स्मार्ट फोन यांसारखे साहित्य मोफत मिळणार आहे. तर वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, कुबड्या, चष्मा, श्रवणयंत्र, गुडघा बेल्ट आणि दाताची कवळी यांसारखी सहाय्यक उपकरणे दिली जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे:
ADIP योजनेसाठी: दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, शिक्षणाचा पुरावा (अंध असल्यास) आणि फोटो.
वयोश्री योजनेसाठी: आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि फोटो.
शिबिरांचे वेळापत्रक:
रत्नागिरी: 24 फेब्रुवारी 2025
राजापूर: 25 फेब्रुवारी 2025
लांजा: 27 फेब्रुवारी 2025
संगमेश्वर: 28 फेब्रुवारी 2025
चिपळूण: 1 मार्च 2025
जिल्हा प्रशासनाने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.
रत्नागिरीत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहित्य तपासणी शिबिरे