शासन अलर्ट मोडवर…लाडक्या बहिणींमागे पडताळणीचा फेरा…!
संजय गांधी निराधार योजना, पीएम स्वनिधी अन् चारचाकी असलेल्या महिलांनाही मिळणार नाही लाभ
मुंबई व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे, एकाच कुटुंबातील दोन महिला लाभ घेऊ शकतात, लाभार्थी महिला केंद्र किंवा राज्य सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी, पाच एकरापेक्षा जास्त जमीन त्या कुटुंबाकडे नसावे, असे प्रमुख निकष आहेत, शासन निर्णयात कोणताही बदल न करता आहे त्याच निकषांची काटेकोर पडताळणी होऊन त्यात पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींनाचा यापुढे लाभ दिला जाणार आहे. तत्पूर्वी, ज्या महिलांना स्वत:हून लाभ नको आहे, अशांसाठी तसा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावरच फेब्रुवारीचा लाभ मिळेल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.