न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी….
तळवली (मंगेश जाधव)- *पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर इतर सर्व शिक्षक वृंद यांनी पुष्प वाहुन विनम्र अभिवादन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंगावर प्रकाशझोत टाकला. या सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मुख्याध्यापक श्री .एम. ए. थरकार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गोष्टी रुपाने अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत,प्रास्ताविक,आभार प्रदर्शन इत्यादी सर्व जबाबदा-या इयत्ता 8 वी ब च्या विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. या सर्व विद्यार्थ्यांचा व भाषणे करणा-या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सर्व विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. श्रीनाथ कुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात कांही विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या होत्या. त्यामुळे उत्साहात भर पडली. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते 12 वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, जेष्ठ शिक्षक श्री.साळुंके सर, श्री.देवरुखकर सर, सौ. नाईक मॅडम, श्री. गवळी सर, श्री. कुळे सर, श्री. पुनस्कर सर, सौ. कांबळे मॅडम, प्रा. आयरे मॅडम लिपिक श्री. कदम सर, श्री.अक्षय चव्हाण, श्री. प्रणय आरोलकर इ. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.