विरार पूर्व तलाठी कार्यालय खाजगी व्यक्तींच्या हातात……!
प्रतिनिधी :- निलेश रहाटे
एकीकडे शासनाने तलाठी कार्यालयात खाजगी व्यक्ती ठेऊ नये म्हणून २०१७ व २०२४ ला महसूल व वन विभाग मंत्रालय नी परिपत्रक काढले आहेत त्या परिपत्रकाचे उल्लंघन करत मंडळ अधिकारी विरार ( पूर्व ) कार्यालय तालुका वसई जिल्हा पालघर यांनी कार्यालय मध्ये तीन – तीन खाजगी व्यक्ती प्रत्यक्ष कामाला ठेवलेले माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे प्रचार प्रमुख श्री अनंत पाटील विरार हयांनी हि बाब वरिष्ठा च्या निर्दशनात आणून दिली आहे . सदर ह्या बाबत वरिष्ठ अधिकारी ची काय भूमिका असेल अस्या अधिकारी वर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील इकडे लक्ष्य लागले आहे
मुळातच शासकीय अधिकारी यांना कामाची गरज आहे असे दिसून येत नाही व ज्याना ठेवले आहे त्याना गेली ८ वर्ष पगार हा कोण देत होते ? तरी वरिष्ठ अधिकारी हयांनी तात्काळ सखोल चौकशी करून शाशनाची फसवणूक करणारे व कामचुकार अधिकारी वर योग्यती कारवाई करावी असे तक्रारपत्र संबंधित अधिकारी हयांना दिले आहे.