रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुका येथील शालेय पोषण आहार अंतर्गत 100% लेखापरीक्षण पूर्ण
गुहागर (वार्ताहर) – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नुकतेच गुहागर तालुक्यातील शालेय पोषण आहार सुरु असलेल्या सर्वच शाळांचे लेखा परिक्षण 100% करण्यात आले.
सदर लेखा परिक्षण शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी पुणे च्या अधिकाऱ्यामार्फत करण्यात आले. लेखा परिक्षण दरम्यान बैंक पास बुक सन २०20-21 ते सन २०23-24 पर्यंत, सन २०20-१1 ते सन २०23-२4 पर्यंतचे कॅशबुक, सन २०20-21 ते सन २०23-२4 या कालावधीतील साठा शिल्ल्क नोंदवही, सन २०२०-21 ते सन २०23-२4 या कालावधीतील तांदूळ खर्च विवरण नोंदवही, सन २०20-2१ ते सन २०23-24 या कालावधीत शासन खाती भरणा करण्यात आलेल्या रक्कमांचे चलन, व्हाउचर फाईल्स उपयोगिता प्रमाणपत्र (प्रपत्र ब) आदी बाबी तपासणी करण्यात आल्या. सदर लेखा परिक्षण सी.ए.अक्षर आंबेकर, सहाय्यक लेखा परिक्षक समाधान ननवरे यांनी केले. यावेळी गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.