खरवते येथील स्व. गोविंदराव निकम क्रीडा नगरीचे भव्य क्रिकेट मैदान उद्घाटनासाठी सज्ज 25 रोजी होणार भव्य उदघाटन सोहळा – व्यंकटेश अय्यर, रिंकु सिंग यांची प्रमुख उपस्थिती
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण – शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते दहिवली मधील गोविंदराव निकम क्रीडा नगरीमध्ये साकारण्यात आलेल्या भव्य अश्या क्रिकेट मैदानाचा उदघाटन सोहळा 25 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न होणार आहे.संपूर्ण जिल्ह्य़ातील क्रिकेट खेळाडूंना एक हककाच व्यासपीठ मिळवून देणे.व कोकणातील सामान्य कुटुंबातील खेळाडूंना देश पातळीवर खेळण्याची संधी निर्माण करुन देणे या उद्देशातून सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या संकल्पनेतून हे मैदान साकारण्यात आले आहे. रणजी दर्जाच्या क्रिकेट सामन्यांसाठी हे मैदान उत्कृष्ट असे व्यासपीठ म्हणून नावारूपास येणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 11 वाजता या मैदानाच्या उद्घाटनासाठी आमदार शेखरजी निकम, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आमदार कीरण सामंत, भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक व आयपीएल मधील सुप्रसिद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत, भारतीय क्रिकेट मधील एकदिवसीय क्रिकेट सामने व आयपीएल सारख्या प्रसिद्ध सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे व्यंकटेश अय्यर व रिंकु सिंग हे आघाडीचे खेळाडु उपस्थित राहणार आहेत. तसेच क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड, सचिन कोळी ,सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड हे देखील उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व क्रिकेट प्रेमी व खेळाडु याचे साठी हे पाच पिच असणारे मैदान एक पर्वणी ठरणार आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी केले आहे.