तळवली हायस्कूलच्या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद …

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली हायस्कूलच्या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद …

SaR
तळवली हायस्कूलच्या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद …

तळवली (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन शिक्षण सोसायटीचे न्यू स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली,ता.गुहागर, जि.रत्नागिरी या प्रशालेत आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला.

दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.विज्ञान शिक्षक श्री.ओंकार पुनस्कर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एकापेक्षा एक अशा प्रतिकृतींचे उत्तम प्रकारे प्रदर्शन मांडण्यात आले होते.प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर व जेष्ठ साहित्यिक श्री.ज्ञानेश्वर झगडे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडणी केलेल्या प्रतिकृती सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले.
प्रतिकृती पहात असतांना विद्यार्थी अगदी आत्मविश्वासपूर्ण प्रात्यक्षिक करून दाखवत होते,त्यासाठी लागणारे साहित्य व खर्च नाममात्र झाले. कमीतकमी खर्चात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशी बनवली हे विद्यार्थी आवर्जून सांगत होते.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गटानुसार 28 प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ प्रशालेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी घेतला.
या विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या प्रतिकृतीचे परीक्षण श्री.पुनस्कर सर,श्री. देवरुखकर सर व श्री.बागल सर यांनी केले.त्यामध्ये प्रथम क्रमांक ‘ वाॅटर सेव्हर ‘ या प्रतिकृतीला मिळाला. ही प्रतिकृती कु. सोमण श्रीधर संतोष, कु.पिलवलकर दुर्वास सुधाकर, कु.कदम सुयश सुधीर यांनी तयार केली होती. द्वितीय क्रमांक ‘ हायड्रोलिक पॉवर ‘ या प्रतिकृतीला मिळाला. ही प्रतिकृती कु.घारे मारिया सलामत व कु. कुळे अपेक्षा श्रीनाथ यांनी तयार केली होती. तर तृतीय क्रमांक ‘ वाइंड टर्बाइन ‘ या प्रतिकृतीला मिळाला. ही प्रतिकृती कु.कारेकर तनुश्री नोमेश, कु.डावल श्रावणी संदीप, कु.जोशी स्वरा उमेश यांनी तयार केली होती. उत्तेजनार्थ पारितोषिक ‘ इलेक्ट्रीक जनरेटर ‘ या प्रतिकृतीला मिळाले ही प्रतिकृती कु.आग्रे आर्यन सूर्यकांत, कु. चव्हाण पार्थ प्रदीप,कु.भुवड तन्मय रमेश यांनी तयार केली होती. तसेच दुसरे उत्तेजनार्थ ‘ पेरिस्कोप ‘ या प्रतिकृतीला मिळाले. ही प्रतिकृती कु.कळंबाटे ओंकार श्रीधर, कु.शिगवण आर्यन संदीप यांनी तयार केली होती.
विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या सर्व प्रतिकृती उत्तम प्रकारच्या होत्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे,त्यांच्यात संशोधन वृत्ती निर्माण करणे व भविष्यकाळात देशाला वैज्ञानिक मिळावेत, या उद्देशाने मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विषय शिक्षक श्री.ओंकार पुनस्कर सर यांनी मेहनत घेऊन या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.यामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्री. पुनस्कर सर यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा राजापूर - संदीप शेमणकर  बदलत्या काळासोबत जुन्या,...
Read More
कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश  वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा यू गुहागर - युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत...
Read More
मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! *रत्नागिरी/ राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वेगवेगळ्या कारवाया...
Read More
लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

 धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय **पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा)...
Read More
धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी   बेणी बुद्रुकच्या कुसुममळेवाडीत मध्यरात्रीची घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,...
Read More
लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द

नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द प्रशांत पोवार *नाटे, ता. राजापूर : पर्यावरणपूरक...
Read More
नाटे ग्रामपंचायतीचा प्लास्टिक बंदीचा दणका; नियम मोडल्यास 25 हजार दंड व परवाना रद्द