जागतिक महिला दिनी आबलोलीच्या बचत गटाच्या CRP सौ. मिनल कदम यांना “पाणलोट धारिणीताई” पुरस्काराने सन्मानीत.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक महिला दिनी आबलोलीच्या सौ. मिनल कदम यांना “पाणलोट धारिणीताई” पुरस्काराने सन्मान

 

आबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समितीचा स्तुत्य उपक्रम

 

आबलोली (संदेश कदम) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आबलोली ग्रामपंचायत व पाणलोट विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने “पाणलोट क्षेत्र रथयात्रा” आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी, समाजसेवा आणि पाणलोट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आबलोली येथील माजी ग्रामपंचायत सदस्या आणि बचतगटाच्या सीआरपी सौ. मिनल संदेश कदम यांचा “पाणलोट धारिणीताई” पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

दिल्ली येथील भूसंधारण विभागाच्या तंत्रज्ञ श्वेता नारायण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, जलसंधारण विभागाचे पाणलोट क्षेत्र प्रकल्प अधिकारी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलम पालव, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागरचे उपअभियंता मंदार छत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ग्रामविकासाच्या दिशेने भरीव कार्य करणाऱ्या सौ. मिनल कदम यांना हा पुरस्कार मिळाल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे संपन्न झाला.

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...