जागतिक महिला दिन ग्रामपंचायत मुरादपूर येथे उत्साहात साजरा

संगमेश्वर │ पंचायत समिती संगमेश्वर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मुरादपूर येथेजागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर थोर व्यक्तींना पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिलांसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी *पर्यवेक्षिका सौ. उषा पवार* यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना लेक लाडकी अभियान, बेटी बचाव बेटी पढाव आणि महिला सबलीकरण यावर मार्गदर्शन केले. तसेच, लहान मुलींचे कौतुक करून गीत गायन कार्यक्रमही पार पडला.
स्वच्छ भारत मिशन विभागाच्या सौ. सावी दळवी यांनी स्वच्छता अभियान आणि विविध योजनांविषयी माहिती दिली, तर उमेद विभागाचे अधिकारी श्री. रूपेश चव्हाण यांनी स्वयं सहाय्यता गटांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी रंगोळी स्पर्धेत सहभाग घेतला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी सौ. कुलकर्णी,सरपंच सौ. बांडागळे आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,सौ. प्रतिभा जाधव, यांनी केले. विविध उपक्रमांनंतर , सौ. ललिता गुडेकर, यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.