*मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड वर्षांहून अधिक प्रतीक्षा; राज्य व केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) शौचालय योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात न्याय कधी?*
*रत्नागिरी प्रतिनिधी निलेश रहाटे*
मुख्य संपर्कप्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (रत्नागिरी जिल्हा) तथा पत्रकार
रत्नागिरी जिल्ह्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) शौचालय योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी गेली ४ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने मी दि. 31 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेलद्वारे प्रत्यक्ष भेटीसाठी विनंती केली होती.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून दि. 6 जानेवारी 2025 रोजी माझा ई-मेल प्राप्त झाल्याची नोंद देत तो “मुलाखत कक्षाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे” असे लेखी कळविण्यात आले.
मात्र, त्यानंतर आजपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाकडून भेटीबाबत कोणतीही तारीख अथवा वेळ निश्चित करण्यात आलेली नाही.
या प्रकरणी तालुका व जिल्हा स्तरावरील संबंधित कार्यालयांकडे मंत्र्यांकडे अनेक वेळा तक्रारी, निवेदने, माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे व इतर पुरावे सादर करूनही समाधानकारक परिपत्रक नुसार कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती आणि उपलब्ध पुरावे थेट मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडण्याची माझी इच्छा होती.
माझा मुख्यमंत्री महोदयांना एकच प्रश्न आहे—राज्य व केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) शौचालय योजनेतील कथित भ्रष्टाचाराबाबत न्याय मागणाऱ्या एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला आणि पत्रकाराला आपली बाजू मांडण्यासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? मुख्यमंत्री कार्यालयाने “मुलाखत कक्षाकडे पाठविण्यात आले” असे कळवून दीड वर्षांहून अधिक कालावधी लोटला, तरी प्रत्यक्ष भेटीची वेळ कधी मिळणार?










