रमजान महिन्याच्या पवित्र सणात अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी केली मुस्लिम दुकानदार बांधवां सोबत रोजा इफ्तार पार्टी
नंदकुमार बगाडे पाटील यांचं कडून
सोलापूर (प्रतिनिधी ) रमजान म्हटलं की,पवित्र सण आणि याच पवित्र सणात महिनाभर मुस्लिम बांधव कडक उपवास ठेवतात आणि संध्याकाळी तो उपवास सोडतात, सोलापूर जिल्हा रेशन दुकानादार संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम बांधवा सोबत अधिकारी व रेशन दुकानदार संघटना वतीने रोजा इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात आले होते निमित्त होते कर्तव्य दक्ष उपजिल्हाधिकारी तथा अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर शहर ओंकार पडोळे यांचा वाढदिवस.
याच वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा रेशन दुकानादार संघटनेच्या सर्व दुकानदरांनी वाढदिवस सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी वेदशास्त्र पंडितांच्या अतिशय मंत्रमुग्ध वातावरणात ओंकार पडोळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.संतोषजी सरडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, नोव्हेंबर महिन्यापासून दुकानदाराचे कमिशन जमा न झाल्याने, सर्वच दुकानदार आर्थिक अडचणीत आहेत, त्यात मुस्लिम बांधवांचा हा पवित्र सण असल्याने कमिशन बाबतीत शासकीय प्रक्रिया होईपर्यत जिल्हा रेशन दुकानादार संघटनेने गरजू मुस्लिम दुकानदार बंधूना तोपर्यंत अनामत निधी द्यावी जेणेकरून सण उत्साहात साजरा करता येईल, त्यास जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर यांनी तात्काळ सकारात्मक अनुमोदन देत जागेवरच जिल्हा संघटनेच्या वतीने मदत जाहीर केली गरजू रेशन दुकानदारासाठी सूचक संतोषजी सरडे व अनुमोदन देण्यारे जिल्हाध्यक्ष सुनिल अण्णा पेंटर यांनी दिलेल्या सकारात्मक भावनेला भारावून गेलेल्या दुकानदाराच्या वतीने परिमंडळ विभाग ड चे खजिनदार श्री.वसीम भाई शेख यांनी मनापासून आभार मानले, त्यानंतर दुकानदारांनी सत्कारमूर्ती ओंकार पडोळे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला जिल्हा रेशन दुकानादार संघटनेने वाढदिवसाचे अप्रतिम नियोजन,धार्मिक व सामाजिक बांधिलकी,पुष्प गुच्छ ऐवजी रोपे देऊन शुभेच्छा देत निसर्गाची जोड जोपासल्याने ओंकार पडोळे यांच्या वाढदिवस सोहळ्यास त्रिवेणी संगम पहायला मिळाल्याचे कौतुक करत हा वाढदिवस कायम स्मरणात राहिलं,असे सांगत अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.