???? राज्य संघटक चंगेजखान पठाण यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी; चिपळूणमध्ये संपर्क नेत्याशी रणनीती चर्चा
शिवसेनेचा कोल्हापूर महापालिकेवर लक्ष!
चिपळूण (प्रतिनिधी):
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक श्री. चंगेजखान पठाण यांच्याकडे नुकतीच कोल्हापूर महानगरपालिकेच्या जबाबदारीची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर चंगेजखान पठाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चिपळूणमध्ये संपर्क नेतेपदी असलेल्या आ . भास्कर शेठ जाधव यांची भेट घेऊन आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा केली.
बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठीचे मार्गदर्शक मुद्दे, स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्त्यांचे नियोजन, वॉर्डनिहाय समिती गठन, तसेच युवांमध्ये पक्षबळ वाढवण्याचे धोरण यावर विचारमंथन झाले.
श्री. पठाण यांनी सांगितले की, “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना नव्या जोमाने उभारणी करत आहे. कोल्हापूर महापालिकेतही शिवसेना आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, यासाठी आम्ही संघटनात्मक तयारीला सुरुवात केली आहे.”
या भेटीदरम्यान स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कोल्हापूरसह कोकणातही पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने अशा भेटीगाठी आणि समन्वयाची सुरुवात महत्त्वपूर्ण ठरतेय.
—
???? #ShivSena #ChengezkhanPathan #KolhapurMahapalika #UddhavThackeray #ShivsenaKonkan #ChiplunNews #RatnagiriVartahar #PoliticalNews
????️ फोटो
—