वाटद रायवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव

highlits

*वाटद रायवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव*

*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

वाटद रायवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद रायवाडी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान जिल्हा परिषद वाटद रायवाडीच्या उपाध्यक्षा सौ. चेतना चेतन जोशी यांना मिळाला.

या कार्यक्रमाला वाटद गावातील ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ व सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गावाचे नाव विविध क्षेत्रांत उज्ज्वल करणाऱ्या गुणवंतांचा करण्यात आलेला सत्कार. कुमारी श्रुती सुधाकर जोशी हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ५२२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल, तसेच अजित अनंत किंजळे यांनी ४२ किलोमीटरच्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेली परी किरण मोहिते आणि मागील वर्षी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेले निष्कर्ष विनोद वरवटकर व तस्यम आलीम यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री. आबा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नितीन झगडे तसेच राज्यस्तरीय पुरस्कार विजेते श्री. किंजळे सर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक सौ. सुर्वे मॅडम, उपशिक्षक श्री. माने सर, अंगणवाडी सेविका सौ सुधा दिलीप किंजळे आणि अंगणवाडी मदतनीस सौ. प्रिया भिमराव जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

गुणवंत विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या यशातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नितीन झगडे उपाध्यक्ष सौ.चेतना जोशी शिक्षणतज्ज्ञ विनोद वरवटकर, दिपक आलीम, भालचंद्र पिपूटकर सर्व समिती वरील सदस्य तसेच पालकांचे व ग्रामस्था चे मोलाचे सहकार्य लाभले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

Horoscope

Weather

और पढ़ें

भरत गोगावले रायगडचे नवे पालकमंत्री; शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य  : पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडसह रायगडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून जल्लोष; जिल्ह्याच्या विकासाला वेग मिळण्याची अपेक्षा

राज्य

शहर चुनें