सेवा संकल्प अभियान: गुहागर उर्दू शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांनी रेखाटली ‘स्वप्नातील सुंदर शाळा’

सेवा संकल्प अभियान: गुहागर उर्दू शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांनी रेखाटली ‘स्वप्नातील सुंदर शाळा’

गुहागर:

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुहागर उर्दू येथे “स्वच्छ व सुंदर शाळा हीच आपली सेवा” या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. शाळेच्या मुख्याध्यापिका बागवान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भावनांचा आविष्कार

चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा माऊली जसा बाळा” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या भावना चित्रांच्या माध्यमातून कागदावर साकारल्या. मुलांनी आपल्या ‘स्वप्नातील सुंदर व स्वच्छ शाळेची’ विलोभनीय चित्रे रेखाटून आपल्यातील सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.

आरटीई गाभानुसार कलागुणांना वाव

शिक्षण हक्क कायद्याच्या (RTE) मुख्य उद्देशानुसार, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग झेप घ्यावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सेवा संकल्प अभियानामुळे विद्यार्थ्यांना आपली कला दाखवण्याची एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मुख्याध्यापिका बागवान मॅडम यांनी स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून सुयश प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे गुहागरचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गुहागर केंद्रामध्ये ‘सेवा संकल्प अभियानाची’ प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध शाळांमध्ये विविध उपक्रमांचे सुयोग्य नियोजन करण्यात

आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें