गुहागर तालुक्यातील पडवे गावात शासकीय, सामाजिक आणि जमीन हक्कांचा वाद! गणेश विसर्जनाच्या पारंपरिक जागेवर बेकायदा बांधकामाचा गंभीर आरोप

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पडवे हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील धार्मिक-सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्वधर्मीय प्रयत्नशील असतानाच, अलीकडील काळात घडलेल्या काही घटनांनी गावात गैरसमज चे वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदू समाजाच्या पारंपरिक गणेश विसर्जन स्थळी झालेले अतिक्रमण, बेकायदेशीर झोपडपट्ट्यांची वाढ, ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, आणि शासकीय निधीच्या गैरवापराचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहेत.
तक्रारकर्ते कोण आहेत?
श्री. गजानन यशवंत गडदे व श्री. सुजेन्द्र चंद्रकांत सुर्वे – हे दोघंही गावाचे ज्येष्ठ नागरिक व माजी ग्रामपंचायत सदस्य असून, त्यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये अनेक गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत, जे केवळ स्थानिक पातळीवरील नसून जिल्हा प्रशासनासाठीही चिंतेचा विषय आहेत.
⭕ मुख्य मुद्दे काय आहेत?
✅ पारंपरिक गणेश विसर्जन जागेवर अतिक्रमण:
गेल्या ६०-७० वर्षांहून अधिक समुद्र किनाऱ्यावर हिंदू समाजाच्या गणपती विसर्जनासाठी वापरली जाणारी जागा अलीकडेच बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, रत्नागिरी . पत्तन विभाग, रत्नागिरी, मत्स्यविभाग (फिशरीज ) यांचेकडून मच्छीमारांसाठी मिळालेल्या विविध योजनांतील निधीतून ‘मच्छी ओटा’ रस्ता व छोटी जेटी उभारण्यात आले. मात्र त्या जागेचा वापर आता खासगी झोपड्या आणि वैयक्तिक मालकी ,कच्च्या बांधकामांसाठी केला जात आहे.
✅ सरकारी निधी खर्च करून मिळवला खोटा मालकी हक्क:
सदर बेकायदेशीर झोपड्यांचे कर पावती‘ निर्मल ग्रामपंचायतीकडून काढण्यात आले असून, त्या आधारे ही व्यक्ती त्या जमिनीवर मालकी हक्क सांगत आहेत. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी व्यावसायिकांना जागा भाड्याने देण्यात येत आहे, ज्यातून महिन्याला आर्थिक फायदा घेतला जात आहे.सदर ची अनधिकृत बांधकामे ही मागील १५/२० वर्ष पासून सुरू आहेत.
✅ खाजगी जमिनीत बेकायदेशीर रस्ता आणि साहित्य साठा:
तक्रारकर्त्यांच्या वैयक्तिक जमिनीतील (सर्वे क्र. ३५) बागायती परिसरात समुद्रात भर टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. त्या परिसरात आता मासेमारीचे साहित्य, भंगार वाहनं, खडी-वाळूचा साठा, फुटलेल्या होड्यांचे यंत्र इत्यादी बेवारस वस्तू ठेवल्या आहेत. या गोष्टींमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे आणि शेतीचे नुकसान होत आहे.
✅ फक्त पायवाट दिली – पण रस्त्यात रूपांतर!
सदर रस्त्यासाठी तक्रारकर्त्यांनी फक्त पायवाट वापरण्याची तोंडी परवानगी दिली होती, मात्र आज त्या ठिकाणी हक्क सांगून जमावाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या भूमी अधिकारांवर गदा आणणारी आहे.
⭕ राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय…
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही स्वार्थी पुढारी हे सर्व अतिक्रमण प्रकरण प्रोत्साहित करत आहेत. ज्याची येथील मुस्लीम समाजाला कोणत्चयाही विकासा साठी जागा जमीन दिली नाही जे स्वताचे पोट भरण्यासाठी गाव सोडून बाहेर गेलेत तेच आता त्याचे मालमत्तेला काहीही नुकसान झालेले नसताना, स्वतः वैयक्तिक हिता साठी मुस्लीम समाजाला पुढे करून हिंदू-मुस्लीम यांच्यात गैर समज निर्माण करत आहेत आणि हा प्रकार संपूर्ण गावाच्या सामाजिक सलोख्याला हानी पोहचवणारा आहे.
⭕ अशा ३ जागा जिथे गणपती विसर्जन होई, तिथे आज अतिक्रमण आहे:
- मुस्तर खळे यांचे घराशेजारील जागा
- हयात खळे यांच्या जवळील परिसर
- मजीदशेजारील बंदर परिसर
- या तीनही पारंपरिक विसर्जन स्थळी सध्या मुस्लीम मोहल्ल्यातील काही लोकांनी बेकायदेशीर बांधकाम करून ताबा घेतल्याचे आरोप आहेत.
????२० लाखांचा रस्ता, आता ८५ लाखांचा घोटाळा?
पडवे एस.टी. स्थानक ते जेटीपर्यंत सुमारे ५०० मीटरचा रस्ता ५-६ वर्षांपूर्वी २० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता. त्या निधीचा स्रोत ग्रामपंचायतीला माहिती नाही. अलीकडे, त्या रस्त्यासाठी पुन्हा ८५ लाखांचा निधी MMB कडून मंजूर झाला आहे – तोही बोगस प्रस्ताव दाखवून. काही जागा मालक आणि समाजसेवकांनी यावर आक्षेप घेतल्याने, हा संभाव्य घोटाळाही उघडकीस येत आहे.
सर्च रिपोर्ट – प्रस्तावित रस्ता पडवे भाटले ते पडवे बंदर या नावाने सुमारे ८५लख रु.चे अंदाज पत्रक असलेली दिनाक-१५/०३/२०२४जी वर्क ओर्डर मिळाली आणि सदर चे काम पावसाळा धरून ९ महिन्यात पूर्ण करायचे होते. मुळातच हा रस्ता ५/6 वर्षापूर्वी पडवे एस.टी. स्थानक ते बंदरटोक (जेटीपर्यंत)असा पूर्ण झालाहोता.त्यावेळी समंतीपत्रक हि सुर्वे भावकी यांची फक्त पडवे येथील गणेश मंदिर येथ पर्यंत च होती मात्र त्यावेळी काही मुस्लीम समजा तील लोकांनी विनती केल्याने तो खाली बंदर टोक खाजगी करणातून फक्त पायवाट म्हणून दिला होता. परंतु आता हाच रस्ता आता ग्रामपंचायत तिने बहुमताचा जोरावर २६ नं.रजिस्टर वर नोंद केला आहे. मुळात ग्रामपंचायत मधील २६ नं.रजिस्टर ला नोंद असणे म्हणजे त्याचेवर ग्रामपंचायत आणि जनतेचा हक्क असणे होत नाही . हे आधी लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र आता नवीन रस्ता ला हेच दाखले ग्रामपंचायत ने जोडले आहेत. आता प्रशासन यना २६ नं. चे दाखले वर ८५लख निधी उपलब्द करून देता येतो का? यांचाही खुलासा सबंधित जागामालक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांचे कडे विचारणा करण्यात आली आहे. तर आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या प्रस्तावाला जे समंती पत्र जोडला आहे तो मुळात या रस्ता साठी नव्हता तो सामन्तीपात्र हा पडवे फाटा ते पडवे ST. STAND हा रस्ता रुंदीकरणासाठी तेथील जागामालकांनी दिला होता. नंतर त्याचा चुकीचा वापर होतोय हे समजताच त्या लोकांनी यावर हरकत घेतली होती. या संपूर्ण बोगस प्रस्ताव दाखल करून चुकीचा निधी खर्च करणारे अधिकारी यांचे विरोधात जागा मालक श्री. महेश गडदे ,समिर गडदे ,गजानन गडदे यांनी सबंधित खात्याकडे तक्रार दाखल केली आहे.
???? सोबत महाराष्ट्र मेरिटेम बोर्ड रत्नागिरी यांनी प्रस्तावित रस्ता साठी जी कागद पत्र निर्मल ग्राम्.पंच्यात पडवे ने जोडली ती यादी. . ???? ???? प्रस्ताव PDF.येथे CLICK करा ???? |
???? तक्रारकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
- अतिक्रमित गणपती विसर्जन स्थळे त्वरित मोकळी करण्यात यावीत.
- समुद्र किनाऱ्यावरील सर्व अनधिकृत झोपड्या, अडगळ, आणि व्यवसाय हटवण्यात यावेत.
- महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, मत्स विभाग (फिशरीज) रत्नागिरी जिल्हा विभाग आणि निर्मल ग्रामपंचायतच्या कारभाराची सखोल चौकशी करण्यात यावी.
- ज्या भूमीवर अतिक्रमण झाले आहे, ती मूळ मालकांना पुन्हा मिळावी. आणि गावठाण जमिनी वरील अतिक्रमण काढावे..
पडवे गावातील हे प्रकरण केवळ जमीन हक्काचे नाही, तर धार्मिक परंपरांचा, सामाजिक सलोख्याचा, आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेचा प्रश्न आहे. प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर याचे पर्यवसान मोठ्या वादात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
???? वरील संपूर्ण प्रकरणाची सखोल पडताळणी होण्यासठी श्री.सुर्वे.आणि गडदे यांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमन्री उदय सामंत.मंत्री. नितेश जी राणे आणि आ.भास्कर शेठ जाधव, जिल्हाधिकारी साहेब रत्ना. यांना पत्रव्यवहार आणि ONLINE तक्रार दाखल केल्याची समजते तर मा.मुख्यमंत्री कार्यालय यांचे कडून सुर्वे यांना लवकरच या प्रकरणाची आपण चौकशी संबधित खात्यामार्फत करू असा ???? MAIL आल्याचे समजत. |
???? ही बातमी सामाजिक माध्यमांवर अधिकाधिक पोहचवा, जेणेकरून संबंधित प्रशासन लवकरात लवकर जागे होईल आणि गावात शांतता व न्याय नांदेल.
वार्तांकन – श्री सुजेन्द्र सुर्वे, पडवे.माजी उपसरपंच , सदस्य – मानव अधिकार आणि महिला बालविकास संघटना, समन्वयक – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन रत्नागिरी.