जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने फुलणार राज्यातील शेती: महाराष्ट्र शासन आणि M2 Labo यांची भागीदारी
मुंबई, दि. ७: शेतीमध्ये जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार आहे. जपानी एम २ लॅबो संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रात “एम2 स्मार्ट व्हिलेज लॅबो” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेतीचा वापर करून मातीचे पुनरुज्जीवन, मॉडेल फार्म, ग्रीनहाऊस शेतीसारख्या प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत होणार आहे.
एम 2 लॅबो ही सुझुकीची शेती संबंधित संस्था असून, मुंबईत नोंदणीकृत झालेली ही पहिली जपानी संस्था आहे. या संस्थेच्या अध्यक्षा युरिको कातो सान यांनी या भेटीदरम्यान राज्यातील कृषी विकासासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली.
यावेळी भारतातील शेतमजुरांना जपानमध्ये अधिकृत परवाना प्राप्त करून रोजगार उपलब्ध करून देण्यावरही चर्चा झाली. याशिवाय, तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी “ज्युनियर व्हिलेज” संकल्पना मांडण्यात आली.
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात Center of Excellence स्थापन करून, जपान आणि भारतातील शेती कंपन्यांमध्ये सहकार्य साधण्यात येणार आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे AI for Sustainable Development (A4SD) चा प्रभावी वापर करून शाश्वत शेती विकासाला चालना देणे.
या बैठकीला M2 Labo संस्थेचे प्रमुख अधिकारी युरिको कातो, प्रसून अग्रवाल, देवांग ओझा, मित्र संघटनेचे अध्यक्ष समीर खाळे आणि जपानी प्रतिनिधी मसाको मियाशीता उपस्थित होते.
#MaharashtraAgriculture #JapaneseTechnology #M2Labo #DevendraFadnavis #SmartFarming #AIinAgriculture #GreenhouseFarming #SoilRejuvenation #SmartVillage #SustainableFarming #AgriTechIndia #FarmersIncome #YouthInFarming #IndiaJapanPartnership