सम्राट चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न – विधिमान बॉईज विजेता
पनवेलकर संकुल किक्रेट संघाच्या उपक्रमाला खेळाडूंचा आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद; २० संघांचा सहभाग
नवी मुंबई (मंगेश जाधव)
सम्राट ११ पनवेलकर संकुल किक्रेट संघाच्या वतीने दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सम्राट चषक – २०२५ या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन खरवई मैदान, बदलापूर (पूर्व) येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत विधिमान बॉईज, पोदार संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तुळशी आस्था वॉरियर्स यांनी द्वितीय क्रमांक तर उमापार्क बॉईज संघाने तृतीय क्रमांक मिळवला. विजयी संघांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच, सहभागी व पराजित संघांनाही सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
स्पर्धेच्या ठिकाणी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. मैदानावर उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींनी चुरशीच्या सामने आणि उत्कंठावर्धक क्षणांचा मनमुराद आनंद लुटला. आयोजकांनी शेवटपर्यंत उत्कृष्ट नियोजन करत स्पर्धा यशस्वी केली.
फोटो: सम्राट चषक २०२५ स्पर्धेदरम्यान विजयी संघाचा सन्मान करताना आयोजक
हॅशटॅग्स:
#SamratCup2025 #UnderarmCricket #PanvelkarCricket #BadlapurCricket #CricketTournament #GrassrootCricket #Samrat11 #CricketInNaviMumbai #LocalCricket #CricketNewsMarathi #सम्राटचषक२०२५ #पनवेलकरसंघ #बदलापूरक्रिकेट #मराठीक्रीडाबातम्या #क्रिकेटस्पर्धा

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators