दादासाहेब रूपवते कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन 11 एप्रिल रोजी संगमनेर येथे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दादासाहेब रूपवते कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन 11 एप्रिल रोजी संगमनेर येथे

♦️ भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव व रूपवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महत्त्वपूर्ण बहुजन मेळावा

आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल.

संगमनेर : बहुजन शिक्षण संघ, मार्केट पब्लिकेशन व सुजात फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव आणि कालकथित बहुजन नेते दादासाहेब रूपवते यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन ११ एप्रिल २०२५ रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सतीश ओहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. संघराज रूपवते तर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. प्रल्हाद लोलेकर यांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी व माजी आमदार लहू कानडे लाभणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा ताई रूपवते यांची उपस्थिती लाभणार आहे.

 

कार्यक्रमाचे तपशील :

सकाळी 10 ते 11 : गायक विकास भालेराव आणि सहकाऱ्यांचा सादरीकरण

11 ते 1 : उद्घाटन सोहळा

1 ते 2 : परिसंवाद – “भारतीय संविधानाने आजचे समकालीन वास्तव”

अध्यक्ष : प्रा. डॉ. सुरेश जोंधळे (पुणे)

प्रमुख वक्ते : डॉ. श्रीरंजन आवटे, प्रा. डॉ. मिलिंद कसबे, प्रा. डॉ. राहुल गोंगे

नंतर : दादासाहेब रूपवते जन्मशताब्दी निमित्त कार्यकर्ता सन्मान सोहळा

या विशेष कार्यक्रमात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजक समिती आणि सतीश ओहोळ यांनी केले आहे.

#दादासाहेबरूपवते #कार्यकर्त्यासन्मानसोहळा #भारतीयसंविधान #बहुजनचळवळ #महात्माफुलेजयंती #SangamnerEvents #AmbedkarThoughts #BahujanUnity #SocialJustice #AmritMahotsav

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...