तळवली हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
शैक्षणिक-सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम
तळवली (मंगेश जाधव) – पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती ११ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीनाथ कुळे सर यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मुख्याध्यापक एम. ए. थरकार सर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनीही पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना थरकार सर म्हणाले, “ज्योतिराव फुले यांनी सामाजिक विषमता, अंधश्रद्धा आणि निरक्षरतेविरुद्ध लढा दिला. त्यांनी स्त्रिया आणि मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आजचा समाज त्यांच्यामुळेच शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी झाला आहे.”
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीनाथ कुळे सर यांनी केले होते. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कुळे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
#महात्मा_फुले_जयंती #तळवलीहायस्कूल #शैक्षणिककार्य #समाजिकजागृती #RatnagiriNews #GuhagarUpdates

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators