निवेली ग्रामपंचायतीत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सरपंच स्नेहा कूवेस्कर यांच्या हस्ते बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण; ग्रामपंचायत कर्मचारी व सेविकांची उपस्थिती
राजापूर (दिनेश कुवेस्कर) – तालुक्यातील निवेली ग्रामपंचायतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच स्नेहा दिनेश कूवेस्कर यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
या वेळी आरोग्य सेविका सौ. माळी मॅडम, अंगणवाडी सेविका अनुष्का जोशी, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रणय टूकरुल हेही उपस्थित होते. कार्यक्रमात सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. स्थानिक पातळीवर सामाजिक सलोखा व समानतेचे मूल्य जपणाऱ्या अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
हॅशटॅग्स:
#आंबेडकरजयंती #निवेलीग्रामपंचायत #राजापूरबातम्या #डॉबाबासाहेबआंबेडकर #GramPanchayatNews #AmbedkarJayanti2025