पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबारात मृत्यू, महाराष्ट्रातील काही जखमी
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांच्या गाड्यांवर अज्ञात दहशतवाद्यांचा गोळीबार; १० जण जखमी, दोन जणांची प्रकृती चिंताजनक
जम्मू – जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे आज दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांच्या गाड्यांवर गोळीबार करत एक भीषण हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून सुमारे १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दहशतवाद्यांनी एका पर्यटकांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर परिसरात प्रचंड गोंधळ उडाला असून जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यामागे कोणत्या गटाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, केंद्र आणि राज्य प्रशासन सतर्क झाले असून जखमींना तातडीची वैद्यकीय मदत दिली जात आहे. याप्रकरणी अधिक तपशीलांची प्रतिक्षा आहे.
हॅशटॅग्स:
#PahalgamAttack #JammuKashmir #Terrorism #TouristsAttacked #MaharashtraTourists #KashmirNews #BreakingNews

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators