पहलगाम दहशतवादी हल्ला: पनवेलचे दिलीप देसले ठार, कामोठ्याचे पाटील दाम्पत्य जखमी
अमरनाथ यात्रेदरम्यान पर्यटकांवर गोळीबार; रायगड, पनवेलसह श्रीनगरमध्ये मदत केंद्र कार्यान्वित
बातमी- मंगेश जाधव
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अमरनाथ यात्रेदरम्यान मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेल सेक्टर १२ येथील दिलीप देसले (वय अंदाजे ५८) यांचा मृत्यू झाला. तसेच कामोठे येथील माणिक पाटील व त्यांची पत्नी सुबोध पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत स्थिरता असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
पनवेलमधील निसर्ग ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून २१ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ३९ पर्यटक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. हल्ला झालेल्या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांची विचारपूस करत धर्म विचारून गोळीबार केला. यामध्ये दिलीप देसले ठार झाले, तर पाटील दाम्पत्य जखमी झाले. माणिक पाटील हे कस्टम विभागातून सेवावृत्त झालेले कर्मचारी आहेत.
कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी पाटील कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत त्यांची विचारपूस केली. दरम्यान, पहलगाम परिसरात अजून काही पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात असून, श्रीनगरमध्ये मदत कक्ष उभारण्यात आले आहेत.
श्रीनगर मदत कक्षासाठी संपर्क:
0194-2463651 / 2457543 / 2483651
व्हॉट्सअॅप – 7780805144 / 7780938397 / 7006058623
रायगड जिल्ह्यातील संपर्कासाठी:
आपत्ती व्यवस्थापन – 02141-222118 / 222097
मोबाईल – 8275152363 / 9763646326
हॅशटॅग्स:
#पहलगामहल्ला #AmanathYatraAttack #पनवेल #कामोठे #जम्मूकाश्मीर #TerroristAttack #MaharashtraTourists #EmergencyContacts

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators