श्रमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश
परी अजय बावकर, सर्वेश लाखण आणि काव्या चौधर यांची शिष्यवृत्तीसाठी निवड; रत्नागिरीतून कौतुकाचा वर्षाव
बातमी – संदीप शेमणकर
रत्नागिरी : श्रमिक विद्यालय शिवार आंबेरे, रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत इयत्ता पाचवीचे विद्यार्थी कु. परी अजय बावकर, कु. सर्वेश संदिप लाखण आणि कु. काव्या नारायण चौधर यांनी उत्तीर्ण होत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यालयात आणि पंचक्रोशीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवत्या यशासाठी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि संपूर्ण शिक्षण संकुलाचे विशेष अभिनंदन होत आहे. स्व. नंदकुमारजी मोहिते सरांची प्रेरणा आणि मुख्याध्यापक थुळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन याचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.
संस्था पदाधिकारी व मुंबई शिक्षण समितीनेही या गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले असून विविध स्तरातून श्रमिक विद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हॅशटॅग्स:
#रत्नागिरी #श्रमिकविद्यालय #शिष्यवृत्ती2025 #विद्यार्थीयश #पाचवीशिष्यवृत्ती #रत्नागिरीशिक्षण #Ambere #ShikshanSamiti
फोटो