अंध कलाकाराच्या कला गुणांना प्रोत्साहन देणे काळाची गरज : आमदार हेमंत औगले
श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना आणि माता रमाई प्रतिष्ठानतर्फे विशेष कार्यक्रम
आहिल्यानगर, प्रतिनिधी :
श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना आणि माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंध कलाकारांच्या भिमगीतांचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाने उपस्थितांचे मन जिंकले.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई सामाजिक प्रतिष्ठान आणि भीमशक्ती प्रतिष्ठानच्या महिला भगिनींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी संपूर्ण महिलांनी आंबेडकरांना अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदिप भाऊ मगर होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून सुनिल भोलके साहेब यांनी भूमिका बजावली. संस्थापक अध्यक्ष आबांदास निकाळजे, आहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समितीचे नंदकुमार बगाडेपाटिल, माता रमाई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनिल श्रिभवन, माजी तहसीलदार मगरे (सोनवणे), सामाजिक कार्यकर्ते किरण काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला युवा सामाजिक कार्यकर्ते करणदादा ससाणे, सरपंच सौ. सारिका प्रेमचंद कुंकूलोळ, गणेश भिसे, शितल फाउंडेशनचे अध्यक्ष मच्छिंद्र ज्ञिभषण, समीर पठाण, राजा भोज प्रकाश आहिरे, दीपक तुसे तसेच श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत औगले यांनीही विशेष उपस्थिती लावली.
आपल्या भाषणात आमदार औगले म्हणाले, “अंध कलाकारांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे.” तसेच, “डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला मतदानाचा हक्क मिळवून देत लोकशाही बळकट केली आहे.” असे सांगत, “श्रीरामपूरकरांना निधी कमी पडू देणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि विविध गाण्यांचे सादरीकरण अंध कलाकारांनी सादर केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत भोसले, मोहन शिंदे, सुनिल संसारे व माता रमाई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन नंदकुमार बगाडेपाटिल यांनी केले.
हॅशटॅग्स:
#श्रीरामपूर #आंबेडकरजयंती2025 #भीमशक्तीसंघटना #मातारमाईप्रतिष्ठान #अंधकलाकार #सामाजिककार्य #HemantOgle #AmbedkarJayanti #SamajikKarya