प्रकाश कातकर यांचे निधन : राजापूरवर शोककळा
हॅपी होम बोअरवेलचे मालक व राजापूर अर्बन बॅंकेचे संचालक प्रकाश कातकर यांचे अल्पशा आजाराने निधन; आज अंत्यसंस्कार
राजापूर | प्रतिनिधी – संदीप शेमणकर
राजापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक, हॅपी होम बोअरवेलचे मालक व राजापूर अर्बन बॅंकेचे संचालक प्रकाश कातकर (वय अंदाजे ५५) यांचे सोमवार, २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजता कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजापूर शहरावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.
कातकर यांची ओळख राजापूर तालुक्यातील कुणबी समाजाचे आधारस्तंभ म्हणून होती. विविध संघटनांतून सक्रिय सहभाग घेत समाजसेवेत ते अग्रणी होते. शनिवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना प्रथम रत्नागिरीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रकाश कातकर यांच्या निधनाने राजापूर तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. आज सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हॅशटॅग्स:
#प्रकाशकातकर #राजापूर #हॅपीहोमबोअरवेल #राजापूरअर्बनबँक #शोककळा #RatnagiriNews #RajapurNews