शाळांना २ मेपासून उन्हाळ्याची सुट्टी; शिक्षण विभागाचे अधिकृत पत्र जाहीर
१ मे रोजी निकाल जाहीर करण्याचे आदेश; पुढील वर्षासाठी शाळा सुरू होण्याच्या तारखा देखील ठरल्या
बातमी मजकूर:
नवी मुंबई (मंगेश जाधव) – राज्यातील सर्व माध्यमांच्या मनपा प्राथमिक शाळा तसेच खाजगी अनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक शाळांनी आपला वार्षिक निकाल १ मे रोजी जाहीर करावा, तसेच २ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी द्यावी, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात अधिकृत पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, इतर शिक्षण मंडळाच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू असतील, अथवा महत्त्वाचे उपक्रम सुरु असतील, तर सुट्टीबाबतचा निर्णय संबंधित शाळा प्रशासनाने घ्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षात विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सोमवार, १६ जूनपासून नियमितपणे सुरू कराव्यात. तर विदर्भातील उष्णतेच्या पार्श्वभूमीवर तेथील शाळा २३ ते २८ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत सत्र घेऊन ३० जूनपासून पूर्णवेळ सुरू कराव्यात, असे निर्देश माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.
#हॅशटॅग्स:
#शाळा_सुट्टी #निकाल_जाहीर #शिक्षणविभाग #उन्हाळीसुट्टी #नवीनशैक्षणिकवर्ष #विदर्भशाळा