चिंद्रवळे येथे संयुक्त जयंती व सारनाथ बुद्ध विहार रौप्य महोत्सव १६-१७ मे रोजी
बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, महिलांचा मेळावा आणि दोन अंकी नाटकाचे आयोजन
बातमी – संदेश कदम,
चिंद्रवळे (गुहागर) येथे भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे तसेच सारनाथ बुद्ध विहाराच्या जिर्णोद्धार व रौप्य महोत्सवाचे आयोजन दिनांक १६ व १७ मे २०२५ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहकारी संघ गुहागर शाखा क्र. ५५, रमाई महिला मंडळ व चिंद्रवळे बौद्धजन प्रतिष्ठान (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात १६ मे रोजी सकाळी ९ वाजता बुद्ध मूर्ती मिरवणूक, प्रतिष्ठापना, ध्वजारोहण, मनोगत आणि मान्यवरांचा सत्काराने होणार आहे. दुपारी १.३० वा. स्नेहभोजनानंतर रात्री ९ वा. विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होतील.
१७ मे रोजी सकाळी ९ वाजता बुद्धपूजा पाठ, नंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, महिलांचा मेळावा, स्पर्धा, स्नेहभोजन, बक्षीस वितरण आणि रात्री १०.३० वा. ‘कन्या ही सासुरासी जाये’ या दोन अंकी नाट्यकृतीचे सादरीकरण होणार आहे.
बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना बौद्ध उपासक हेमंत रोहिणी अनंत पवार (तळवली) तथा पूर्वश्रमीचे भिक्खू अभिधम्मपाल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. के.एस. सावरे (डी.बी.जे. कॉलेज, चिपळूण) व धम्मचारी जिनरुची (त्रिरत्न बौद्ध महासंघ, चिपळूण) उपस्थित राहणार आहेत.
हॅशटॅग्स:
#चिंद्रवळे #गुहागर #बुद्धविहार #संयुक्तजयंती #रौप्यमहोत्सव #बौद्धकार्यक्रम #रत्नागिरीवृत्त
फोटो