भारताशी पंगा घेतल्यानं पाकिस्तान कंगाल!
तीन दिवसातच हाती भिकेचा कटोरा!
उपशीर्षक:
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे प्रत्युत्तर; पाकिस्तानचे रडार, एअरबेस, दहशतवादी तळ उद्ध्वस्त
बातमी …
नवी दिल्ली – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ने थरकाप उडवल्यानंतर पाकिस्तानचा गर्वच भंगला आहे. युद्धबंदी लागू झाल्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या विशेष ब्रीफिंगमध्ये विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली. भारताचे एस-400 मिसाइल बेस व ब्रह्मोस इन्स्टॉलेशन उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता, तो पूर्णतः खोटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, भारताच्या जबरदस्त प्रत्युत्तरात पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्जाची याचना केली असून, त्यांचं अर्थकारण कोलमडल्याचं स्पष्ट झालं आहे.
१० मे रोजी पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले की, पाकिस्तानने जम्मू-कश्मीरपासून पंजाबपर्यंत ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने त्यांचे २६ हल्ले उधळून लावत रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर, चुनियन येथील एअरबेस आणि पसरूर व सियालकोटमधील रडार साईट्सवर अचूक हल्ले केले. स्कार्दू, भोली, सरगोधा आणि जैकोबाबाद येथील लष्करी ठिकाणांसह एअर डिफेन्स आणि रडार प्रणालीही निष्क्रिय करण्यात आली.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ७ मे रोजी पार पडलेल्या कारवाईत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन यांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमधील अड्डे मलब्याच्या ढिगाऱ्यात परिवर्तित करण्यात आले.
हॅशटॅग्स:
#IndiaStrikesBack #OperationSindoor #PakistanCollapse #IndianArmy #LOCNews #NationalSecurity #RatnagiriVibhag
फोटो