करंजे येथे ‘गोवर्धन गोशाळा’ प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते संपन्न!
नारायण राणे यांच्या संकल्पनेतून साकार; गोवंश संवर्धन व शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीकडे वाटचाल
सिंधुदुर्ग….
कणकवली तालुक्यातील करंजे येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून ‘गोवर्धन गोशाळा’ प्रकल्प उभारण्यात आला असून, या प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
हिंदू संस्कृतीत गायीला पूजनीय मानले जाते आणि तिचे धार्मिक व वैद्यकीय दृष्टिकोनातूनही महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच भावनेतून गोवंशाचे संवर्धन, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळावे आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती घडावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार प्रवीण भोसले तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने जिल्हावासी उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#Govardhan #Goshala #NarayanRane #DevendraFadnavis #EknathShinde #Sindhudurga #Maharashtra #ShivSanskriti #RuralDevelopment