असोरे येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी
महामानवांच्या मिरवणुकीसह धम्मसंस्कार, वक्तृत्व स्पर्धांना भरघोस प्रतिसाद
तळवली (मंगेश जाधव) – गुहागर तालुक्यातील असोरे गावात बुद्ध पौर्णिमा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बौद्धजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिद्धार्थ कला वैभव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात धम्मध्वज आणि पक्षध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली. त्यानंतर उपस्थित उपासक व उपासिकांना धम्मसंस्कार दिले गेले. गावातील महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या निमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विशेषतः मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी त्रिशरण आणि पंचशीलचे पठणही करण्यात आले.
कार्यक्रमास गावातील अनेक जेष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि बालकांनी हजेरी लावली. सामाजिक सलोखा, बौद्ध संस्कृतीचा गौरव आणि नव्या पिढीमध्ये धम्माची रुजवण या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
#बुद्धपौर्णिमा #गुहागर #असोरे #धम्मसंस्कार #बौद्धसंघटना #सामाजिकएकतेचा_उत्सव #रत्नागिरी
फोट