रुग्णांच्या सुदृढतेसाठी परिचारिकांचे समर्पण कौतुकास्पद मान्यवरांचे गौरवोद्गार :

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांच्या सुदृढतेसाठी परिचारिकांचे समर्पण कौतुकास्पद मान्यवरांचे गौरवोद्गार :

पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे नर्सेस दिनानिमित्त सत्कार,

नवी मुंबई (मंगेश जाधव)

रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांइतकीच काळजी परिचारिकांकडून घेतली जाते. डॉक्टर वैद्यकीय उपचार करतात त्याबरोबरच रुग्णांसाठी अहोरात्र जागणा-या परिचारिकांचे समर्पण म्हणजे खरोखरच कौतुकास्पद असते असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. आद्यपरिचारिका प्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय नर्सेस दिन म्हणून साजरा केला जातो. याच नर्सेस दिनाचे औचित्य साधून पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे सत्कार सोहळयाचा कार्यक्रम झाला. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडीक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रुग्णालयातील नर्सेसना गुलापुष्प आणि स्मृतीचिन्ह देउन गौरविण्यात आले. पत्रकार मित्र असोसिएशन प्रत्येकाने समाजाप्रती केलेल्या कार्याची दखल वेळोवेळी घेत असते. नर्सेस दिनाच्या निमित्ताने आमचा केलेला सत्कार निश्चितच पुढील कार्यासाठी प्रेरणा देईल असे उदगार सत्कारार्थींनी व्यक्त केले. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवाजी पाटील, डॉ. प्रमोद पाटील, सहायक अधिसेविका ज्योती गुरव यांच्यासह अधिकारी तसेच पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडीक, कार्याध्यक्ष नितीन जोशी, ग्रामीण अध्यक्ष शशिकांत दळवी, अनुराग वाघचौरे उपस्थित होते.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...