तथागत भगवान गौतम बुद्ध, चक्रवर्ती प्रियदर्शी सम्राट अशोक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतिबा फुले , भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव आयोजन
नवी मुंबई (मंगेश जाधव)
देवडे भीमज्योत हितवर्धक सेवा संघ, मुंबई / ग्रामीण आणि संघमित्रा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ मे २०२५ या कालावधीत संयुक्त जयंती महोत्सव – २०२५ मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
१५ मे रोजी सकाळी १० वाजता बुद्ध वंदनेने या भव्य महोत्सवाची सुरुवात होईल. या तीन दिवसीय कार्यक्रमात समाजोपयोगी उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजसेवेचा वसा –
▪️महोत्सवाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मा वाटप, तसेच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
*घर-घर संविधान भेट अभियान राबवून लोकांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्नही संघटनेकडून होत आहे.*
सांस्कृतिक महोत्सवाची लयबद्ध धून
१६ मे रोजी “कोकण ताशा स्पर्धा – २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. ‘परंपरेची गुंज, कोकणचा साज’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेमध्ये विविध संघ आपली ढोल-ताशा सादरीकरणे सादर करतील.
या स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक वादनाला मंच मिळावा आणि नव्या पिढीत सांस्कृतिक जाणीव जागृत व्हावी, हा उद्देश आहे.
पारितोषिके:
प्रथम: रुपये ११,१११ व आकर्षक चषक
द्वितीय: रुपये ७,७७७ व आकर्षक चषक
तृतीय: रुपये ५,५५५ व आकर्षक चषक
सर्व सहभागी संघांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
महिलांसाठी ज्ञानाचे पर्व
१७ मे रोजी महिलांसाठी “होम मिनिस्टर” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छोटे मोठे खेळ खेळून व प्रश्नोत्तर पद्धतीने होणाऱ्या या कार्यक्रमात महापुरुष, सामाजिक विषय, चित्रपट, संगीत, विज्ञान आणि सामान्य ज्ञान यांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
प्रथम विजेत्या महिलेला पैठणी हे विशेष बक्षीस दिले जाणार आहे.
दोन दिवस गाव मर्यादित क्रिकेट चे सामने आयोजित केले गेले आहे. त्यामध्ये स्थानिक क्रिकेट संघ भाग घेतील.
बालकलाकारांची रंगत-स्थानिक मुलांसाठी नृत्य स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जात असून त्यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
समारोप सोहळा-
१७ मे रोजी समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवचन व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आपले लाडके आमदार मा. श्री. भैयासाहेब किरण सामंत या समारंभास विशेष उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.
“संयुक्त जयंती महोत्सव – २०२५” हा सामाजिकतेची जाण, सांस्कृतिक वारशाचा गौरव आणि महापुरुषांच्या विचारांचा जागर यांचा संगम ठरणार आहे.
सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.