शुभांगी साठे यांची सिंधुदुर्गच्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती
रत्नागिरीत साडेतीन वर्षे उपजिल्हाधिकारी आणि प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कारकीर्द; सिंधुदुर्गमध्ये पदभार स्वीकारला
बातमी
रत्नागिरी येथे सुमारे साडेतीन वर्षे उपजिल्हाधिकारी आणि त्यानंतर दहा महिने प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या शुभांगी साठे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी पदावर बढतीसह बदली झाली आहे. त्यांनी आज अधिकृतरित्या या नवीन पदाचा पदभार स्वीकारला.
शुभांगी साठे या प्रशासनातील एक कुशल आणि अनुभवी अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळात महसुल विभागाच्या विविध कामांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यामुळे त्या एक लोकप्रिय महिला अधिकारी म्हणून नावारूपाला आल्या.
नव्या जबाबदारीबाबत प्रतिक्रिया देताना साठे म्हणाल्या, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून जनहिताची कामे प्रभावीपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करीन.”
हॅशटॅग्स:
#शुभांगीसाठे #सिंधुदुर्ग #अप्परजिल्हाधिकारी #रत्नागिरी #महसुलविभाग #महिलाअधिकारी #बदलतीनियुक्ती
फोट