सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे दातृत्व; मुख्यमंत्र्यांकडे वीस लाखांचा निधी सुपूर्द
आचरा येथील सदानंद करंदीकर यांची पुण्याई; पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीसाठी आयुष्यभराची कमाई अर्पण
बातमी – सिंधुदुर्ग प्रतिनिधी
मुंबईतील मंत्रालयात एक साधा, पण असामान्य भेट घेणारा नागरिक आला. डोंबिवलीहून लोकलने आणि त्यानंतर बसने प्रवास करत सदानंद विष्णू करंदीकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचले. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येकी दहा लाखांचे दोन धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
करंदीकर यांनी हे दान न गाजावाजा करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त समाजासाठी अर्पण केले. त्यांच्या या दातृत्वाची प्रशंसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृतज्ञतेने हे धनादेश स्वीकारले व करंदीकर यांच्या संवेदनशीलतेला आणि समाजनिष्ठेचा गौरव केला.
आपल्या आयुष्यभराच्या मेहनतीने साठवलेली रक्कम समाजासाठी समर्पित करून सदानंद करंदीकर यांनी ‘देणगी म्हणजे देण्याचा आनंद’ हे सिध्द केले आहे. अशा सजग नागरिकांमुळे समाजात सकारात्मकता टिकून आहे.
हॅशटॅग्स:
#सदानंदकरंदीकर #सिंधुदुर्ग #आचरा #दातृत्व #मुख्यमंत्रीनिधी #पंतप्रधाननिधी #समाजसेवा #DevendraFadnavis #EknathShinde
फोटो