पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विरार ( पूर्व) दक्षिण मंडळ तर्फे युवा मेळावा संपन्न
विरार – संदिप शेमणकर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विरार पूर्व दक्षिण मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी. वेळ सायंकाळी 4.30 वाजता. स्थळ – दामोदर निवास, मनवेल पाडा तलावाच्या बाजूला विरार ( पूर्व) येथे मेळाव्यामध्ये युवकांचा उत्तम असा प्रतिसाद होता भारतीय जनता पार्टी युवा पिढीसाठी तत्परतेने प्रयत्न करत असते. आणि यापुढे देखील ते प्रयत्न सुरू राहतील.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती नालासोपारा विधान सभेचे आमदार राजनजी नाईक, जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते जोगेंद्रप्रसाद चौबेजी, वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव अशोक शेळके, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष विनीत तिवारी, मंडळ अध्यक्ष विशाल राऊत, वैभव झगडे, अनुसुचित जाती जिल्हा सरचिटणीस ॲड. सतीश बोंडवे, वैद्यकीय सेल युवा जिल्हा अध्यक्ष डॉ. महेंद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे विरार पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष मनीष वैद्य व मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.